WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जगभरात चार हजारांवर बळी

Image

जगभरात करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता चार हजारावर गेली असून चीनमध्ये सोमवारी १७ बळी गेले. जगात १०० देशांत करोनाचा प्रसार झाला असून मृतांची संख्या ४०११ झाली आहे. एकूण १ लाख १० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान कॅनडातील ब्रिटीश कोलंबियात एका वृद्धाश्रमात करोनाचा तेथील पहिला बळी गेला आहे. ओंटारियो व ब्रिटीश कोलंबियात एकूण ७० रूग्ण आहेत.

इराणमध्ये दिवसात ५४ बळी

तेहरान- इराणमध्ये करोनाने बळी गेलेल्यांची संख्या ५४ झाली आहे. त्यामुळे एकूण २९१ जण या संसर्गाने बळी पडले असून ८०४२ जणांना संसर्ग झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते किनोश जहानपोर यांनी सांगितले की, कालच्या पेक्षा आज मृतांच्या संख्येत १८ टक्के वाढ झाली असून निश्चित रुग्णांची संख्याही १२ टक्के वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार करोना संसर्गाच्या आजारातून बरे होण्यास कमी लक्षणात दोन आठवडे व तीव्र लक्षणात सहा आठवडे लागतात.

मंगोलियात पहिला रुग्ण

उलानबटार- मंगोलियात करोनाचा पहिला रुग्ण सापडला असून त्यांनी सहा दिवस सीमा बंद केल्या तरी एक रुग्ण सापडला आहे. तो फ्रान्सच्या ऊर्जा कंपनीचा कर्मचारी असून मॉस्कोतून येथे आला आहे. मंगोलियाने चीनलगतची सीमा बंद केली असून, दक्षिण कोरियातून येणारी विमाने बंद केली आहे. उलानबटार व सर्व प्रांतिक केंद्रांवर प्रवास बंदी लागू करण्यात आली आहे.

सायप्रसमध्ये एक रुग्ण

उत्तर सायप्रसमध्ये एक रुग्ण सापडला असून तो जर्मनीतून आलेला पर्यटक आहे

विमाने रद्द

नॉर्वेच्या एअरशटल कंपनीने मार्च ते जूनदरम्यानची तीन हजार विमान उड्डाणे रद्द केली आहेत.

दक्षिण कोरियात भर ओसरला

दक्षिण कोरियात करोनाचा भर ओसरत असून काल तेथे केवळ १३१ नवीन रुग्ण सापडले असून आणखी तीन जण मरण पावल्याने मृतांची संख्या ५४ झाली आहे.

जहाजावरील प्रवासी उतरले

अमेरिकेत ओकलँड येथे नांगर टाकलेल्या ग्रँड प्रिन्सेस जहाजातील प्रवासी उतरण्यास सुरुवात झाली आहे. कॅलिफोर्नियाचे रहिवासी असलेले ९०० जण उद्या उतरणार आहेत.

दोन आठवडे विलगीकरण

परदेशातून येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने दोन आठवडे वेगळे ठेवण्यात येणार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी म्हटले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share