WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परीक्षा वेळापत्रक व निकालाची माहिती एसएमएस मॅसेजद्वारे मोबाईलवर मिळणार

Image

नुकत्याच झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सभेच्या बैठकीत विद्यार्थ्यांना 'परीक्षा वेळापत्रक व निकालाची सूचना' आता त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारा मिळणार आहे. हा महत्वपूर्ण प्रस्ताव पदवीधर मतदारसंघाचे सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी मांडला. ज्याला सभागृहातील समस्त सदस्यांनी समर्थन देत बहुमताने पारित केला. या सुविधेचा फायदा नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया चार जिल्ह्यातील सव्वाचार लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात हा एक महत्वपूर्ण निर्णय मानल्या जात आहे. रातुम नागपूर वीद्यापीठ हिवाळी सत्रात १००० तर उन्हाळी सत्रात जवळपास १२५० परिक्षांचे आयोजन कारीत असते. सत्रांत परिक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परिक्षेत असफल विद्यार्थ्यांना एकावेळी दोन ते तीन परिक्षाचा सामना करावा लागत होता. इंटरनेटची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था फार दयनीय असे. आता या विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलवर परिक्षा कार्यक्रमाची सूचना मिळणार आहे. सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करित होते. निकाल आल्यानंतर रिव्ह्यल्युएशनसाठी फक्त ७ दिवसांचीच मुदत असते. निकालाची माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी रिव्ह्यल्युएशनच्या सुविधेपासून मूकत होते. एवढेच नव्हे तर अनेक विद्यार्थी परिक्षेपासून वंचित हात होते. संबंधीत महाविद्यालय सुद्धा त्यांना योग्य व पुरेशी माहिती देत नव्हते. आता अश्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा फ़ायदा होणार आहे. विशेष म्हणजे निकालाची सूचना न मिळाल्याने पूढ़ील परिक्षेचा अर्ज करित असताना एक महिना किवा जास्त विलंब झाल्यास त्यांना १५०० रूपये ते १४ हजार रूपये विलंब शुल्क भरावा लागत असे. यामुळे विद्यापीठात करोडोच्या रकमेत विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क जमा होत असे. या निर्णयाने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात थांबणार असल्याचे मत एका प्रसिद्धी पत्रकातून सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी व्यक्त कले आहे. या निर्णयाने नागपूर विद्यापीठाला एसएमएस सोयीसाठी आपल्या सॉफ्टवेयरमध्ये मोठ्या प्रमाणात सूधारना करावी लागणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून भविष्यात नागपूर विद्यापीठात भविष्यात मोठे बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करनार असल्याचे मत प्रवीण उदापुरे यांनी व्यक्त कले. ज्यामधे प्रत्येक परिक्षेत सर्वोच्च गूण घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका वेबसाईटवर उपलब्ध करणे, सर्व सुविधांचे फॉर्म, डिग्री, मार्कशीट ऑनलाईन करणे इत्यादीचा समावेश असेल

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share