WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागपुर येथे ‘ट्रिपल लेअर मास्क’ याची ज्यादा दराणे विक्री !

Image

नागपूर : शासनाकडून दीड रुपयात उपलब्ध होणाऱ्या ट्रिपल मास्कचे दर हे विक्रेते २५ रुपये सांगत आहेत.

शहरातील मेडिकल आणि मेयो या शासकीय रुग्णालयांतही विविध मास्कचा काळाबाजार करणारे विक्रेते फिरत आहेत. ते दीड रुपयाचे ‘ट्रिपल लेअर मास्क’ तब्बल २५ रुपयांना विकत आहेत. करोनाची भीती बघता शहरात अचानक नागरिकांकडून विविध प्रकारच्या मास्कची विक्री वाढली आहे. त्यामुळे अनेक औषध दुकानात मास्क उपलब्ध नाहीत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरातील औषध दुकानांत सुमारे ३०० ते ४०० एन- ९५ व त्याहून जास्त इतर मास्क उपलब्ध असल्याचा दावा केला जातो.

शासनाकडून दीड रुपयात उपलब्ध होणाऱ्या ट्रिपल मास्कचे दर हे विक्रेते २५ रुपये सांगत आहेत. ते एकूण मेडिकल, मेयोचे अधिकारीही थक्क झाले आहेत. मेडिकल, मेयोतही इतर मास्क कमी होत असल्याने प्रसंगी या दरात मास्क खरेदी करायचे कसे, हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यातच हे काळाबाजार करणारे विक्रेते एन- ९५ मास्कचे दर तब्बल ३५० ते ४०० रुपये प्रती नगच्या जवळपास सांगत आहेत.खुल्या बाजारात सामान्य नागरिकांकडून त्यांना ट्रिपल मास्कचे ३० रुपये आणि एन- ९५ मास्कचे ५०० ते ६०० रुपये प्रती मास्क मिळत असल्याचा दावाही ते करतात. त्यामुळे नागरिकांची लूट थांबवणार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share