WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी न.प.कला व क्रिडा महोत्सवात थाटात संपन्न.....

Image

सागर मुने, वणी

न.प.प्राथ.शाळा क्र.३ च्या भव्य प्रांगणात वणी नगर परिषदेच्या शाळेतील ११ शाळा व खाजगी २ शाळेतील अश्या एकंदर ४२० खेळाडू व बाल कलावंतानी भाग घेतला.

सदर क्रिडा महोत्सवाचे आयोजन लोकनायक बापुजी अणे न प. उ.प्राथमिक शाळा क्र.४ ने केले.

दि.३मार्च २०२० रोजी क्रिडा व कला महोत्सवाचे उदघाटन झाले.या कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी मा. डाॅ. शरदजी जावळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे, प्रमुख अतिथी वणी न.प.चे मुख्याधिकारी संदिप बोरकर, शिक्षण सभापती अक्षता चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती रंजना उईके,न.प.सदस्य महादेवराव खाडे, धनराज भोंगळे, मायाताई ढुरके, स्वाती खरवडे, मनिषा लोणारे, प्रशासन अधिकारी संजयजी पवार यांची उपस्थिती लाभली.

*याप्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे यांनी," खेळ व क्रिडा ह्या मानवी जिवनाचे अविभाज्य अंग असून खेळामुळे मानवाचा जिवनाकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन सकारात्मक होतो."असे स्पष्ट प्रतिपादन याप्रसंगी केले.*

याप्रसंगी न.प.शाळा क्र.४च्या विद्यार्थांनीने उत्क्रुष्ठ स्वागत न्रुत्य सादर केले.उदघाटनपर कबड्डीचा सामना न.प.शाळा क्र.५ व न.प.शाळा क्र.७ यामध्ये झाला.यात न.प.शाळा क्र.७चा दणदणीत विजय झाला.

कल्याण मंडपम सभाग्रुहात सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन तहसिलदार शाम धनमने उपस्थित होते.

सांस्कुतिक कार्यक्रमात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक न.प.शाळा क्र.७,द्वितीय क्रमांक विवेकानंद प्राथ. शाळा, त्रुतिय क्रमांक न.प.शाळा क्र.६ तर प्रोत्साहनपर न.प.शाळा क्र.४ ला देण्यात आले.

उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक न.प.शाळा क्र. ७,द्वितीय क्रमांक न प.शाळा क्र.५,त्रुतिय क्रमांक ८ ला तर प्रोत्साहनपर न.प.शाळा क्र. ४ ला देण्यात आले.

या सांस्कुतिक कार्यक्रमाचे संचलन वंदना परसावार तर आभार लता ठमके यांनी मानले. नृत्याचे परिक्षण प्रा.योगिता बोबडे व भारती लोहबडे यांनी केले.

न.प.कला व क्रिडा महोत्सवाचा बक्षिस वितरण कार्यक्रम न.प.कल्याण मंडपम सभाग्रुहात संपन्न झाला. बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी बक्षिस वितरक म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, अध्यक्ष म्हणून शिक्षण सभापती अक्षता चव्हाण,प्रमुख अतिथी महिला व बालकल्याण उपसभापती ममता अवताडे,न .प.सदस्य धनराजजी भोंगळे, स्वाती खरवडे, से.निव्रु.मुख्या.दिनानाथ आत्राम,प्रशासन अधिकारी संजय पवार, राज्य पुरस्क्रुत मुख्याध्यापक गजानन कासावार,आयोजक मुख्याध्यापक किशोर परसावार यांची उपस्थिती होती. यावेळी न प 5 शाळेच्या सहायक शिक्षिका कवियत्री रजनी पोयाम यांचा विशेष कवियत्री म्हणून विविध पारितोषिक प्राप्त केले म्हणून सत्कार करण्यात आला.

*यावर्षीच्या क्रिडा महोत्सवात प्राथमिक गटातील सर्वसाधारण विजेतेपद न.प.उ.प्राथ.शाळा क्र.१,तर उपविजेतेपद न.प.शाळा क्र.७ ने प्राप्त केले.*

*उच्च प्राथमिक गटातील विजेतेपद न.प .शाळा क्र.७ ने तर न.प.शाळा क्र.८ ला उपविजेतेपद प्राप्त केले.*

वणी न.प.कला व क्रिडा महोत्सवाच्या उदघाटन व समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सवाच्या आयोजक शाळेचे मुख्याध्यापक किशोर परसावार यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रिडा महोत्सवाचे सचिव दिलीप कोरपेनवार तर आभार उपसचिव प्रभाकर ब्रम्हटेके यांनी मानले.

वणी न.प.कला व क्रिडा महोत्सवाच्या यशस्वीतेकरिता प्रमोद जोगी,अविनाश पालवे,संजय पिदूरकर, विनोद चव्हाण, संतोष शिंदे,प्रेमदास डंभारे,विजय चव्हाण,सुर्यवंशी सर,जाहिद सर,नावेद सर,लता ठमके,विद्या ढेंगळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share