WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बळीराजा चेतना अभियान द्वारे जनजागृती...

Image

सुशिक्षित बेरोजगार बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मनोरंजनात्मक माध्यमातून शेतकरी सक्षम व सुदृढ कसा होईल यासाठी बळीराजा चेतना अभियाना द्वारे जनजागृती करून शासनाच्या योजना, शेतकऱ्यांना शेतीउपयोगी मिळणारे लाभ तसेच आत्महत्या करण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार करून उत्कृष्ट शेतकरी होऊन देशाची प्रतिष्ठा वाढवावी. शेतीला जोडव्यवसाया सोबतच विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला. कोरडवाहू , ओलिताची शेती, फुलांची शेती, भाजीपाला, दुग्धव्यवसाय , फळबाग अशा पध्दतीने जनजागृती करण्यात आली. तसेच या कार्यक्रमातुन हागनदारी मुक्तीवर सुद्धा

ग्रामीण भागातील वास्तववादी जीवनाला अनुसरून नाटिका सादर करण्यात आले ज्यामध्ये गजानन कोरांगे, सागर मुने,आकाश महाडुळे, मंगेश गोहोकर, प्रवीण सातपुते, नितेश चामाटे, करिष्मा नवले, इंगळे काकू इत्यादी कलावंतांनी विविध भूमिका सादर केल्या.

बळीराजा चेतना अभियानाद्वारे चारगाव, मंदर येथे कार्यक्रम करण्यात आला वणीचे तहसीलदार शाम धनमने यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तालुक्यातील गावा गावात करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला गावातील गणमान्य नागरिक , लहान मूल ते वृद्धां पर्यंत तसेच शेतकरी,शेतमजुर व गावकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share