WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची वणी विभागातील पहिली गाव शाखा गठीत

Image

वणी :

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची वणी विभागात प्रथमच गाव शाखा नेरड पुरड येथे स्थापण करण्यात आली.

या शाखेचे उद्घाटक म्हणून दौलत वाघमारे व कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे व विष्णुदास काकडे उपस्तीत होते.शाखा अध्यक्ष पदी प्रवीण उत्तमराव डूबे, उपाध्यक्ष पदी कवडुजी बांगडे तर सचिवपदी रोहित भटवलकर यांची नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी संघटना बांधणी करण्याचा मानस अध्यक्ष प्रवीण डूबे यांनी बोलून दाखवला.

या वेळी संपर्क प्रमुख श्रीमती ज्योती येरेकार, सुभोध बांगडे,किशन कोरडे, भारत लीपटे, किशोर हांडे, रामा कोल्हे, श्याम गिरडकर आणि नवनिर्वाचित सदस्य,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी,आणि संत रविदास महाराज चर्मकार युवा मचं चे सदस्य व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेरड पुरड शाखा सदस्यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share