WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूर जिल्ह्यात कोचिंग क्लासेसच्या नावाने होत आहे फसवणूक

Image

चंद्रपूर : सध्या जिल्ह्यात कोचिंग क्लासेसच्या नावाने पालकांना फसविण्याचा व्यवसाय जोमात सुरू आहे, वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे निकाल आपल्या बुकलेट वर छापून आमचा निकाल उत्कृष्ट कसा असं दाखविण्यात येत आहे, ज्यामुळे पालक सहजपणे फसत आहे.असाच एक प्रकार रिसॉक्सि नावाने कोचिंग क्लासेस शहरातील नागपूर रोड जवळ सुरू करण्यात आला आहे, या क्लासेसचे प्रमुख सलिम खान आहे, त्यांनी आपल्या क्लासेसच्या बुकलेट मध्ये पंजाब येथील विसडम नावाच्या कोचिंग क्लासेसच्या बुकलेटची पूर्णपणे कॉपी केली आहे, महत्वाची बाब म्हणजे हे क्लासेस 2019 ला स्थापन झाले व यांनी चक्क 2019 या चालू सत्राचा निकाल सुद्धा घोषित केला, निकलाबद्दल ज्या विद्यार्थ्यांचे फोटो छापले आहे ते इतर कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहे.

ही सर्व बाब आशिष रामटेके यांनी उघडकीस आणली, सलीम खान व आशिष रामटेके व इतर यांनी मिळून ऑक्सिजन फॉर ड्रीम नावाने कोचिंग क्लासेस सुरू केले होते, परंतु सलीम खान यांनी आपला फायदा बघता रामटेके यांना बाजूला केले व स्वतः रिसॉक्सि नावाने नवीन इन्स्टिट्यूट सुरू केले.

रामटेके यांनी या प्रकाराची बाब मनसेचे राजू कुकडे यांना निदर्शनास आणून दिली, कुकडे यांनी हे प्रकरनाचे गांभीर्य बघता पूर्ण माहिती काढत या प्रकाराची तक्रार पोलीस अधीक्षकांना करणार असल्याची माहिती दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share