WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

करोना व्हायरसचा PUBG वरही परिणाम, गेम लव्हर्सना बसणार ‘हा’ मोठा झटका

Image

करोना व्हायरसचं जगभरात थैमान सुरू असून आता या व्हायरसमुळे PUBG खेळणाऱ्यांचंही टेंशन वाढलंय. Tencent and PUBG Corporation ने करोना व्हायरसमुळे आपली PUBG MOBILE Pro and World league ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे PUBG चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. यापूर्वी कंपनीने या स्पर्धेसाठीचे ग्राउंड इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली होती, तसेच केवळ ऑनलाइन इव्हेंटद्वारेच स्पर्धा होईल असे स्पष्ट केले होते. पण, आता कंपनीने ट्विटरद्वारे ही स्पर्धा पुढे ढकलत असल्याची माहिती दिली आहे. मात्र, पुन्हा कधी स्पर्धा घेतली जाईल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही, त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याचीही शक्यता आहे. PUBG खेळणाऱ्यांमध्ये या स्पर्धेबाबत आणि यातील विजेत्यांबाबत मोठी उत्सुकता असते, पण यावेळी करोना व्हायरसमुळे PUBG लव्हर्सना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share