WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील मोबाईल सेवेचा झाला बट्ट्याबोळ.....!!!

Image

कोरोणा सारख्या जिवघेण्या वायरस बद्दल , खराब नेटवर्किंग मुळे माहिती पोहचविणे कठीण

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक काणा-कोपर्कयात कोरोना सारखा जिवघेणा वायरस हा सर्वत्र हाहाकार करत असतांना, दिसत आहे.त्यामुळे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात, जिल्हा प

प्रशासनाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळेे या जीवघेण्या वायरस पासुन जनता कशा प्रकारे बचाव करू शकते. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी बॅनर पोस्टर, तसेच स्थानिक टि.वि.माध्यम त्याच बरोबर वृत्तपत्र, यामधून जनतेला सावध करण्याचे कार्य प्रशासन करित आहे.सध्याच्या धकाधकीच्या युगात ,विचारांची देवाण घेवाण करण्याचे मुख्य साधन ,म्हणजे मोबाईल सेवा, अति महत्वाचे कुठलेही माहिती अवघ्या सेकंदात दुसर्या पर्यंत पोहचते. याची सर्वांना कल्पना आहे. आणी सध्याची परिस्थिती पाहता माहितीची देवाण-घेवाण करणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे मोबाईल, परंतु कित्येक दिवसापासून वणी शहरातील, मोबाईल सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रत्येक कंपनीचा नेटवर्किंग मध्ये अडचणी असल्यामुळे, एक कॉल लावायला, चार वेळा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता .. मोबाईल सेवा त्वरित सुरळीत करण्यात याव्या .. अशी मागणी जनतेमधुन मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे.

जेनेकरून या जीवघेण्या आजारापासुन बचावाची माहिती सर्वांना देता येईल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share