WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

22 मार्च ला देशात "जनता कर्फ्यू" लागू

Image

प्रवीण चौगुले

सध्या देशभर कोरोना व्हायरस चा हाहाकार माजला आहे. त्या पार्श्वभूमी वर पुणेकर घरातून बाहेर पडायचं नाही. नियमांचे काटेकोर पालन करायचं असा निश्चय करीत सगळीकडे मार्केट, बस थांबा, रस्ते सारे ओस पडलेले दिसून आले.

दरम्यान शहरात 59 रुग्ण आढळून आल्याने पुणेकर सतर्क झाले असून बाहेर पडणे सध्या बंद आहे. येत्या 22 मार्च ला देशात "जनता कर्फ्यू" लागू केला असून प्रधानमंत्री यांनी 130 कोटी भारतीयांना घरातून बाहेर न पडण्याचे आव्हान केले आहे.

अद्याप कोरोनावर कोणतीही लस शोधण्यात आली नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांची चिंता वाढली आहे. आज देशावर फार मोठ संकट ओढवलं आहे. सरकार या स्थितीबाबत सतर्क आहे. प्रत्येकाने संयमाने वागणं गरजेचे झाले आहे. असे मोदी म्हणाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share