WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

होंगकोंगमध्ये कुत्र्यालाही झाली ‘करोना’ची लागण! एकाची मृत्यु व दोघांचा उपचार सुरु!

Image

हाँगकाँगमध्ये करोनाग्रस्त १७ वर्षाच्या पाळीव कुत्र्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर आता अजून दोन श्वानांना हाँगकाँगमध्ये करोनाची लागण झाल्याची माहिती आहे. New York Post ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यू झालेल्या श्वानाला त्याच्या मालकिणीकडून करोनाची लागण झाली होती अशी माहिती आहे. मानवातून प्राण्यामध्ये व्हायरसचा प्रसार झाल्याची शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे.

जगभरात फैलाव झालेल्या करोना व्हायरसचा आता पाळीव कुत्र्यांमध्येही शिरकाव झालाय. या व्हायरसने कुत्र्याचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहेहाँगकाँगमध्ये एका १७ वर्षाच्या पॉमेरियन जातीच्या कुत्र्याला करोनाच्या संशयावरुन आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले होते. १४ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवल्यानंतर त्याला काही दिवसांपूर्वी सोडून देण्यात आले. पण, सूटका झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर येथे एका दोन वर्षाच्या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानालाही करोनाची लागण झाली, आणि आता अजून एका पाळीव कुत्र्याला करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मृत्यू झालेल्या कुत्र्याच्या ६० वर्षीय मालकिणीलाही करोनाने ग्रासले होते अशी माहिती आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share