WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना परिणाम तेलंगणा सीमा सील , लग्न पाहुन्यबिना !

Image

यवतमाळ : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तेलंगणाची सीमा सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. या राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाबाधित नसल्याची खात्री पटल्यानंतरच तेलंगणातील प्रवाशांना यवतमाळात प्रवेश मिळणार आहे.या सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींची खात्री केल्यानंतर प्रवाशांना यवतमाळच्या रस्त्यांवर पुढचा प्रवास करता येणार आहे. या मार्गावरील प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे.मुंबई आणि नागपूर विमानतळावर उतरलेल्या २० जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. होम क्वॉरंटाईन झालेल्या नागरिकांपैकी काही रस्त्यावर दिसल्याची माहिती पुढे आली आहे. अशा नागरिकांना धामणगाव मार्गावरील वसतिगृहात निर्माण केलेल्या कक्षात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले.तीन विवाह पाहुण्यांशिवायगुरूवारी शहरात तीन विवाह आयोजित होते. मात्र १४४ कलम लागू असल्याने या विवाहांचे नियोजित ठिकाण रद्द करण्यात आले. वधु, वर आणि आईवडील, भाऊ, बहीण यांच्या उपस्थितीत हे लग्न उरकविण्यात आले. यावेळी वर आणि वधूनेही चेहऱ्याला मास्क लावले होते.चर्चमध्ये प्रार्थना थांबलीयवतमाळच्या मातृचर्चमध्ये होणारी सामूहिक प्रार्थना कोरोनाच्या धास्तीने थांबविण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टळेपर्यंत प्रार्थना होणार नसल्याचे मातृचर्चच्या वतीने सांगण्यात आले.", "articleBody":"लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तेलंगणाची सीमा सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. या राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाबाधित नसल्याची खात्री पटल्यानंतरच तेलंगणातील प्रवाशांना यवतमाळात प्रवेश मिळणार आहे.या सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींची खात्री केल्यानंतर प्रवाशांना यवतमाळच्या रस्त्यांवर पुढचा प्रवास करता येणार आहे. या मार्गावरील प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे.मुंबई आणि नागपूर विमानतळावर उतरलेल्या २० जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. होम क्वॉरंटाईन झालेल्या नागरिकांपैकी काही रस्त्यावर दिसल्याची माहिती पुढे आली आहे. अशा नागरिकांना धामणगाव मार्गावरील वसतिगृहात निर्माण केलेल्या कक्षात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले.

तीन विवाह पाहुण्यां

शिवायगुरूवारी शहरात तीन विवाह आयोजित होते. मात्र १४४ कलम लागू असल्याने या विवाहांचे नियोजित ठिकाण रद्द करण्यात आले. वधु, वर आणि आईवडील, भाऊ, बहीण यांच्या उपस्थितीत हे लग्न उरकविण्यात आले. यावेळी वर आणि वधूनेही चेहऱ्याला मास्क लावले होते.

चर्चमध्ये प्रार्थना थांबली

यवतमाळच्या मातृचर्चमध्ये होणारी सामूहिक प्रार्थना कोरोनाच्या धास्तीने थांबविण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टळेपर्यंत प्रार्थना होणार नसल्याचे मातृचर्चच्या वतीने सांगण्यात आले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share