WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माजरीत कोरोना वायरस चा संशयित रुग्ण नागपूर च्या गोवरमेंट कॉलेज ला उपचारासाठी रेफर !

Image

वेकोली माजरी क्षेत्रातील ओसीएम मध्ये काम करणारा एक कर्मचारी आज कोरोना वायरस चा संशयीत आढळून आला आहे त्याला विशेष उपचारासाठी नागपूर येथील साशकीय मेडिकल कॉलेज पाठवण्यात आले.

विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे वेकोली माजरी क्षेत्रातील ओसीएम मध्ये काम करणारा एक कर्मचारी हा वणी येथील रहिवासी असून त्यांच्याकडे दोन फ्रांस चे पाहुणे आले होते. ते परत आपल्या देशात गेले परंतु हा संशयित रुग्ण खाजगी रुग्णालयात खोकला ताप सर्दी चा उपचारासाठी करत होता तो दोन तीन दिवसा पासून कामावर येत नसल्याने त्याचे एक का मित्राने फोन केला असता मला कोरोना वायरस झाल्याची शंका होत असल्याचे सांगितले त्यावरून त्याचे मित्रांनी वेकोली माजरी च्या रुग्णालयात उपचारासाठी बोलावले असता तो बदनामी च्या भीती मुळे यायला तयार नोहोता. कोरोना च्या संशयित रुग्णाचे मित्राना ही माहिती वेकोली अधिकाऱ्यांना व वेकोली माजरी च्या रुग्णालयातील डॉक्टराना दिली असता त्याला वेकोली माजरी च्या रुग्णालयात बोलावले व कोरोना ची तपासणी आणि उपचारासाठी नागपूर ला पाठण्याचा निर्णय घेतला परंतु तो जाण्यास तयार नोहोता रुग्णालयात त्या संशयित रुग्णाणी चांगलाचत तमाशा केला वेकोली चे अधिकारी ताबडतोब रुग्णालयात पोहोचले व त्याला विनावनी केली परंतु तो ऐकायला तयार होहोत. पोलीस ठाण्यात व ठाणेदार दोघांना कॉल केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही मग नाईलाजाने जबरदस्ती करून त्याला रुग्णवाहिका मध्ये बसवून नागपूर पाठविण्यात आले.

वेकोली रुग्णालयातील डॉ पाटकर यांनी त्या रुग्णाचे परीवार ला सुद्दा तपासा बोलावले आहे.कालच लोकमत च्या बातमी मध्ये माजरीत हजारो बाहेर राज्यातील लोक वेकोली मध्ये काम करतात व अनेकांचे ट्रेन बस विमानाने अवगमान सुरु आहे त्यामुळे कोरोना वायरस माजरीत संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे असं प्रकाशित केले होते. बारा तासात कोरोना चा संशयित रुग्ण आढळला.

माजरीतील सामाजिक कार्यकर्ते उल्लास रत्नपारखी, मेहबूब हसन माजी सरपंच गोल्ला कोमरय्या यांनी माजरीत कोरोना वायरस चा तपास शिबिर लावण्यात यावे अशी मागणी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share