WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाल्लर कॉलनी येथील युवकांचे श्रमदान....

Image

रस्त्यावर येणारे काटेरी झाडे कापून केले श्रमदान..

सुरज चाटे वणी :- भाल्लर कॉलनी येथील युवकांनी मिळून रस्त्यावर येणारी काटेरी झाडे तथा ये जा करण्यास होणारी अडचण लक्षात घेता दिनांक 28 Image ला सकाळी 12 वाजतापासून 3 पर्यंत श्रमदान करून रस्त्यावर येणारे झाडांची कटाई करून रस्ता समोरच्याला दिसेल आशा पद्धतीने करून श्रमदान केले आहेत.

वणी तालुक्यातील भाल्लर गाव ते भाल्लर कॉलनी तथा आदी परिसर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील झाडांनी व्यापला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती, तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकाला रस्त्यावर आलेल्या झाडा झुडपांमुळे रस्ता दिसेनासा झाला होता हे लक्षात घेता भालर कॉलनी येथील युवकांनी श्रमदानाचा उत्कृष्ट निर्णय घेत संपूर्ण रस्ता साफ सफाई करीत रस्त्यावर येणाऱ्या झाडांची कटाई करीत यामुळे होणारे अपघाताचे प्रमाण कमी होऊन वाहन धारकाला रस्ता मोकळा दिसत आहे, त्यामुळे अशा या श्रमदानाचे परिसरात कौतुक होत आहे, यावेळी प्रफुल बदखल, प्रवीण गायकवाड, नितीन देरकर, प्रणय गणफडे, मयूर मेश्राम, भाविक लोढे, विशाल काकडे, संकेत डांगे, निहाल डुकरे, स्वप्नील कष्टी, राजकरण मोर्या, प्रशांत गायकवाड, शुभम सोनटक्के ,कुणाल चिंचोलकर, अरविंद राजूरकर, धनंजय सिंग, प्रवीण धोटे, महेश भोंगळे , सुरेंद्र आगदारी, मंगेश भोंगळे, सुरज झाडे आदी युवकांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान केले, तसेच हे श्रमदान तीन दिवस चालणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share