WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत विदेशातून आलेले 12 जणांना होम कोरेण्टाइन…… देशांतर्गत 49 प्रवासी स्थानबद्ध :- रोज सकाळी व संध्याकाळी यांची नियमित तपासणी…..

Image

वणी:- सुरज चाटे, प्रतिनिधी,

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. या बिमारीने महामारीचे स्वरूप धारण करू नये. यासाठी वणी येथील आरोग्य यंत्रणा युद्ध स्तरावर कार्यरत आहे. या यंत्रणेमार्फत विदेशातून प्रवास करून आलेले 12 व्यक्ती व देशांतर्गत प्रवास करून आलेल्या 49 व्यक्तींना होम कॉर्नटाइन करून ठेवण्यात आले आहे अशी माहिती येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कमलाकर पोहे यांनी स्टार tv 9 मराठीशी बोलतांना दिली आहे.

कोरोना या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागासोबत महसूल व पोलीस विभाग अतिशय सतर्क असून कोणत्याही स्थितीत या बिमारीने विषाणू पसरू नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतल्या जात आहे. विदेशातून प्रवास करून आलेल्यांची व देशांतर्गत विविध भागातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींची पूर्ण तपासणी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे. या विषाणू विषयी जागरूकता निर्माण झाल्यामुळे बाहेरून प्रवास करून येणारे प्रवासी स्वतः रुग्णालयात येऊन तपासणी करून घेत आहेत. यात आत्तापर्यंत विदेशातून आलेले 12 व देशांतर्गत 49 व्यक्तींची तपासणी करून त्यांना त्यांच्या घरीच पुढील 14 दिवसापर्यंत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विदेशातून आलेल्या 12 व्यक्तीच्या डाव्या हातावर आरोग्य विभागातर्फे शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे या व्यक्ती बाहेर पडल्यास यांना ओळखणे सोपे जाणार आहे. या सर्वांची स्थिती चांगली असून कोरोना या विषाणूचा एकही रुग्ण अजून वणीत आढळला नाही तरी रोज सकाळी व संध्याकाळी यांची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

वणी व आजूबाजूच्या भागातील विद्यार्थी व नोकरदार मोठ्या प्रमाणावर पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी आहेत. अशा गंभीर स्थितीत ते सर्व जण परत येत आहेत. इथे आल्यानंतर सर्वांनी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असे आवाहन स्टार tv9 मराठीशी बोलताना करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share