WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

इतिहासात पहिल्यांदाच : संपूर्ण राज्य लॉकडाउन, कोणालाच पडता येणार नाही बाहेर

Image

करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राजस्थान सरकारनं संपूर्ण राजस्थान राज्य लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधी दुकानं, किराना दुकानं, मीडिया आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टी सुरू राहणार नाहीत. एखाद्या व्हायरसच्या भीतीने संपूर्ण राज्य बंद करण्यात आल्याचे इतिहासात प्रथमच घडले आहे.

जगात सर्वांत प्रथम लॉकडाउन अमेरिकेत करण्यात आले होते. ९/११ दहशतवादी हल्ल्यानंतर तीन दिवसांसाठी अमेरिकेत लॉकडाउन करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१३ साली बोस्टन येथे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लॉकडाउन करण्यात आलं होतं. याशिवाय नोव्हेंबर २०१५ मध्ये पॅरिस हल्ल्यांनतर हल्लेखोरांना पकडण्यासाठई ब्रुसेल्स लॉकडाउन करण्यात आलं होतं.

लॉकडाउन म्हणजे काय

एखादा महाभयंकर आजार पसरत असताना किंवा आपत्तीच्या काळात सरकार लॉकडाउनची घोषणा करते.

ज्या ठिकाणी लॉकडाउन करण्या येते तेथील लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो. केवळ धान्य, औषधी अशा गरजेच्या वस्तूंसाठीच बाहेर पडण्याची परवानगी असते. बँकांमधून पैसेही काढता येतात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share