WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी, मारेगाव शहरासह तालुक्यातील जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद, रस्त्यावर शुकशुकाट

Image

ग्रामीण भागातही कडकडीत बंंद, रहदारीचे रस्ते ओसाड

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारेगांव शहरात ‘जनता कर्फ्यू’मुळे रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. बंदमुळे लोकांनी घरातच राहणं पसंत केले आहे. मुख्ये रस्ते असो व ऍटो, पॉइंटवरही शुकशुकाट दिसून आला. हिच परिस्थिती कुंभा, बोटोणी, मार्डी, नवरगांव, वेगांवासह तालुक्यातील १०३ या गांवाच्या ठिकाणी सुद्धा लोकांनी उत्स्फुर्तपणे या बंद मध्ये सहभागी झाले आहेत. मारेगांव शहरासह तालुक्यातील बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

फक्त पेट्रोलपंप आणि मेडिकल, सुरू

सध्या जनता कर्फ्यू मुळे पेट्रोलपंप, मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे.  काही मेडिकल स्टोअर सुरू आहे. पेट्रोलपंप जरी सुरू असले तरी कुणीही घराबाहेर पडत नसल्याने पेट्रोलपंपावरही शुकशुकाट दिसून येत आहे. असल्याने मार्डी, चौक, डॉ बाबासाहेब चौक, घोषा चौक येथे स्मशान शांतता आहे. ऑटोपॉइंट देखील बंद असल्याने हा परिसरही सामसूम आहे. घरी कंटाळा आल्याने एक दोघांचा अपवाद वगळता मारेगांव शहरासह तालुक्यात कडकडीत जनता कर्फ्यू पाळला जातोय.यासाठी मारेगांव महसूल प्रशासन व पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share