WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरपना येथे जनता कर्फ्यूला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद

Image

ग्रामीण भागातील लोक सुध्दा जनता कर्फ्यूला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद कोरपना तालूक्यातील येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी यांनी केलेल्या आव्हानाला उत्तंम प्रतिसाद मिळाला आहे

सर्वत्र ग्रामीण/शहरातील सर्व

कडीकोट बंद सुकसूकाट दिसत होते

गौतम धोटे-सह संघर्ष भगत-कोरपना-चंद्रपूर

-कोरपना तालुक्यातील नांदाफाटा/बिबी/आवारपूर/वनसळी /गडचांदूर/हरदोना/पारडीँ / अंतरगाव/कोरपना .पिपरी /अकोला/माथा/नवेगाव /भोयगाव/कवठाळा/नांदगाव/बाखर्डी /लखमापूर या ग्रामीण भागातील जनता सुध्दा जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. मा पंतप्रधान-भारत सरकार यांनी कोरोना विरोधात रविवार 22 मार्च रोजी सकाळी ०७:०० ते रात्री. ०९:०० वाजेपर्यत व सर्व भारतीय जनतेला संचारबंदी पाळण्यासाठी व "जनता कार्रफयू काटेकोर पणे  पाळण्याच आदरणीय मोदिजींनी आवाहन केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेद्रंजी मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आव्हानला खुप मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देत आहे. जनता कर्फ्यू 100 % यशस्वी होत असताना दिसत आहे. कोरपना तालुक्यातील संपुर्ण परिस्थितीवर उपविभागीय अधिकारी विलास यामांवार आणी येथील गडचांदूर/कोरपना ठाणेदार हे लक्ष ठेवून आहेत.  चौका चौकात पोलीस बंदोबस्त चोख आहे. गावा-गावात पोलीसांची गस्त सुरु आहे. जनतेनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस विभाग, नगरपंचायत, पंचायत समिती तथा ग्रामपंचायत च्या वतिने करण्यात आले आहे

विषेशतः अल्ट्राटेक सिमेंटच्या मुख्य उद्देश गेटही बंदोबस्त बंद ठेवण्यात आला होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share