WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगांव जवळ वाघाचे दर्शन ,,,एक पशुधन ठार, एक जखमी

Image

प्रतिनिधी सचिन मेश्राम - *मारेगांव जवळ वाघचे दर्शन*

*कोरोनासह वाघाच्या*

*दहशतीत जनता जनार्धन*

*एक पशुधन ठार, एक जखमी*

संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीत असतांना मारेगांव तालुकाही अपवाद नाही. दहशतीत भरीसभर म्हणून मारेगांव शेजारी आता वाघोबा दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांचे शिवारात जाने दुरापास्त होत आहे. किंबहुना वाघाने एका पशुधनाचा पडशा पाडून एका पशुधनास गंभीर जखमी केल्याची घटना शनिवाराला घडली. दरम्यान ठोस उपाययोजना आखण्यात अजून ही वनविभागाला यश आले नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत.

मारेगांव शेजारी असलेल्या स्मशानभूमी लगत हनुमान मंदिरा जवळ वाघाचे दर्शन दिपक नेहारे या दुचाकीने मार्डी जाणाऱ्या इसमास झाल्याने त्याची भंबेरी उडाली. प्रचंड दहशत पसरत असलेल्या कोरोना व्हायरस सोबत मारेगांव तालुका वासीयांच्या मनात आता वाघाची धडकी भरली आहे. तालुक्यातील डोंगरगांव येथील विठ्ठल ताजने शेतकऱ्यांच्या एका पशुधनावर हल्ला चढवून वाघाने ठार केले तर एका पशुधनास गंभीर जखमी केले.

मारेगांव तालुक्यात आजपर्यंत२३पशुधन ठार झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे सावट आहे. वनविभाग मात्र अजूनही साखर झोपेत असल्याने पशुधनाच्या मुत्युचा आकडा फुगत आहे. अलीकडेच कोरोनाच्या दहशतीने जनता घरात राहणे पसंत करित असताना वाघोबा मात्र दहशतीत भर घालत आहे. तालुक्यातील वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या जंगलात वनविभागाने आतापर्यंत३९कँमेरे लावले मात्र कँमेरालाही वाघ हुलकावणी देत असल्याने वनविभागही सुस्त आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीतही भर पडत असल्याने वन विभागाच्या संशायित भुमिकेने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share