WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी पोलीस लाॅक डाऊन मध्ये जनतेला शिस्त लावतांना ....

Image

नागरीकांनी द्यावे पोलिस प्रशासनाला सहकार्य.. ..:-- पोलिस निरीक्षक:-वैभव जाधव

वणी शहर प्रतिनिधी :-निलेश चौधरी

जगभरात सध्या कोरोना वायरस चा प्रादुर्भाव जोराने वाढतांना दिसत असतांना .... शासनाने कोराना वायरस मोठ्या प्रमाणात संक्रमित होत असल्याचे निदर्शनास येताच.. काही नियम व तरतूदी लागू केल्या आहे. या नियमाचे जनतेने योग्य प्रमाणात पालण करून प्रशासनाला सहकार्य करावे. आणी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे. कुठल्याही चौकात सामुहिक, गर्दी करु नये...!

असे आव्हान पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वणी पोलीसांनी नियमानुसार कायद्याचे उल्लंघन करण्यार्यावर कारवाईचा बडगा उगारताच...... पोलीस विभाग हे कोरोना विरोधात सामील झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनाला निस्तनाबूत करण्याकरीता वणी पोलिस प्रशासन ,कार्यवाही सोबत...जनतेला सतर्क राहावे ,तोंडावर रुमाल किंवा मास्क लाऊन बाहेर निघावे ,अशी माहिती पोलिस प्रशासन देत आहे. महाराष्ट्रातील जनतेनि सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोना वायरस गुणाकाराच्या संख्येने थैमान घालत असल्याने... वणीकरांनी योग्य सहकार्य करावे... असे आवाहन ठाणेदार वैभव जाधव यांनी केले. सध्या चिंताजनक परीस्थिती निर्मान झाली असूण, यावर शासनाने कांही आदेश निर्गमिती केले आहे.

त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक झाले आहे. शासनाने काढलेल्या आदेशानुसार जीवनावश्यक सुविधा वगळता..बाकी सर्व दुकाने बंद असल्याचे सध्या दिसत आहे. वणीत आदेशाचे पायमल्ली होताना दिसताच ... पोलीसांनी नियमानुसार कायद्यांचे उल्लंघन करण्यार्यावर कारवाईचा उगरण्यास सुरूवात करतातच .... अखेर पोलीस विभाग हा कोरोना वायरस विरोधातील युद्धात, सामील झाले असल्याचे चित्र वणीकरांना पहावयास मिळाले. त्यामुळे प्रत्येक वणीकर योग्य सहकार्य करतांना दिसत आहे. सदर आदेश हे जनतेच्या हिताकिरता असून,आपली जनता कशाप्रकारे सुरक्षित व निरोगी राहील या उद्देशाने काढण्यात आले आहे.त्यामुळे कोरोना वायरसला मात देण्याकरीता जनतेनि सुध्दा योग्य सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share