WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतात करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे ‘हे’ औषध वापरण्याची परवानगी.

Image

करोनाला रोखण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्सने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध वापरण्याची शिफारस केली आहे. देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाला रोखण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्सने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध वापरण्याची शिफारस केली आहे. COVID-19 चा मुकाबला करण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापन केली आहे. इकोनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हायड्रोक्सी क्लोरोक्वीनचा सरसकट वापर करता येणार नाही. इर्मजन्सीच्या प्रसंगात हे औषध वापरता येईल. राष्ट्रीय टास्क फोर्सच्या या शिफारशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मंजुरी दिली आहे.

प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरस विरोधात प्रभावी ठरत असल्याचे अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. १५ वर्षाच्या आतील मुलांवर हे औषध वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अ‍ॅडव्हायजरीनुसार नोंदणीकृत डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनवर लिहिले असेल तरच हे औषध मिळू शकते.

करोना व्हायरसवर ‘हे’ जपानी औषध ठरतेय प्रभावी, चीनचा दावा

जपानमधील ताप आणि सर्दीवरील एक औषध करोना व्हायरसच्या रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचे चीनच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. द गार्डीयनने हे वृत्त दिले होते.

जपानी कंपनीने बनवलेले फॅव्हीपीरावीर हे औषध करोनाव्हायरसवर प्रभावी ठरत आहे. वुहान आणि शेनझेन येथे ३४० रुग्णांवर या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या असे हँग शिनमीन या चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हे औषध मोठया प्रमाणात सुरक्षित असून, उपचारामध्ये अत्यंत प्रभावी आहे असे हँग यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share