WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Coronavirus: …तर देशातील करोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा ६२ टक्कांनी कमी होईल, 'आयसीएमआर'ने सांगितला मार्ग !

Image

देशामधील करोनाग्रस्तांची संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून नागरिकांना घरात राहण्याचेही आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत. भारतातील ५४८ जिल्हे लॉकडाउन करण्यात आले असून ३० राज्ये सध्या लॉकडाउन आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही अनेकजणांना लॉकडाउन गांभीर्याने घेताना दिसत नाहीयत. रविवारी ‘जनता कर्फ्यू’ला चांगला प्रतिसाद दिल्यानंतर सोमवारी अनेक शहरांमध्ये लॉकडाउन असूनही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसले. सोशल डिस्टन्सींगला प्राधान्य देत नागरिकांनी घरामध्येच रहावे असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र त्याकडे दूर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी आता अनेक ठिकाणी थेट संचारबंदीचा निर्णय सरकारी यंत्रणांना घ्यावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासारख्या १३० कोटींची लोकसंख्या असणाऱ्या देशात सोशल डिस्टन्सींगमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळू शकते असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटलं आहे.

नागरिकांनी घरीच थांबून सोशल डिस्टन्सींगची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर देशातील करोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा ६२ टक्कांनी कमी होईल. तसेच सोशल डिस्टन्सींगमुळे करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांनी कमी करता येईल. त्यामुळे इतर देशांमध्ये वाढत गेलेला करोनाग्रस्तांचा आलेख भारतामध्ये रोखता येईल आणि या साथीवर मात करण्याच्या अधिक संधी यंत्रणांना उपलब्ध होतील, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share