WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

फळ व भाजीपाला मिळणार मुख्य चौकात..... नगरपरिषद चे नियोजन, गर्दी टाळावी प्रशासनाचे आवाहन...

Image

सागर मुने,वणी

वणी शहरात सर्वत्र बंद दिसत आहे. अत्यावश्यक वस्तूसाठी नागरिकांना घरा बाहेर जात येते, गर्दी करू नये असे आवाहन सतत प्रशासन करत आहे मात्र वणी शहरातील भाजी बाजारात नागरिकांची गर्दी होत असल्याने नगर परिषद ने आता शहरातील मुख्य चौकात फळ व भाजीचे दुकाने सुरू राहतील असे परिपत्रक काढले आहे.

भाजी मार्केट, गांधी चौक, सरोदय चौक,टिळक चौक, दीपक टॉकीज चौक, पंचशील चौक, ब्राह्मणी रोड चौक, टिळक महाविद्यालया जवळ , साई मंदिर चौक अशा सर्व ठिकाणी 10 दुकाने असणार आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी तेथूनच फळ व भाजी पाला घेऊन गर्दी टाळावी व प्रशासनाला सहकार्य करावे व कोरोना पासून स्वतःचे व दुसऱ्याचे रक्षण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share