WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात फिरणाऱ्या कोरोना होम क्वारेन्टाईन संशयित रुग्णावर वर वणीत गुन्हा नोंद......

Image

सागर मुने, वणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 14 एप्रिल पर्यंत घरीच राहण्याचे आवाहन केले, मात्र वणी शहरात संशयित कोरोना रुग्ण बाहेर फिरत आहे.

घर सोडून गावात फिरणाऱ्या कोरोना होम क्वालेन्टाईन संशयित रुग्णावर वणीत गुन्हा नोंद झाला आहे . सदरहू रुग्ण साधारण एका आठवड्यापूर्वी दुबईहुन वणी येथे परत आला होता. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला १४ दिवसांकरिता होम क्वालेन्टाईन केले होते .तसा शिक्का त्याच्या हातावरही मारल्या गेला होता परंतु स्वतः प्रकृती उत्तम असल्याची धारणा ठेवून हा गावभर फिरत होता .त्याच्या घरी नियमित तपासणी करायला गेलेल्या दक्षता नियंत्रण समितीच्या चमूला हा रुग्ण घरी न आंढळ्याने वणी पोलीस स्थानकात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे .

यवतमाळ जिल्ह्यात १०५ संशयित रुग्नांना होम क्वालेन्टाईन करण्यात आले आहे .वैद्यकीय चमूंकडून त्यांची नियमित चाचणी करण्यात येत .यवतमाळ जिल्ह्यातील एक व्यक्ती दुबई ला सुतार कामासाठी गेला होता .साधारणपणे एका आठवड्यापूर्वी तो वणी येथे वापस आला होता . त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ,त्याला १४ दिवसांसाठी होम क्वालेन्टाईन करण्यात आले होते . सदरहू व्यक्ती आपली प्रकृती ठणठणीत आहे तर होम क्वालेन्टाईन जरुरत काय असा प्रश्न घेऊन रोज वैद्यकीय तपासणी करणाऱ्या चमूशी भानगड करायचा . त्याच्या घरी रोजच्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी करायला गेलेल्या चमूला सदरहू व्यक्ती घरी न सापडल्याने त्याच्यावर भादवी १८८,२६९ या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या संशयित रुग्णास आता यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातील विलीनीकरण कशात पाठविणार असल्याचे समजते . अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share