WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूर : विदेशातून आलेले 11 व्यक्ती ताब्यात : विनतपासणी धार्मिक स्थळी होते लपून : प्रशासनाने धरून टाकले वन अकादमी येथील विलगीकरणात : प्रशासनाला सहकार्य करा - कोरोना धोका टाळा !

Image

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून सोशल डिस्टंसिन्ग राबविल्या जात असून बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य तपासणी करूनच 14 दिवस होम क्वॉरेंटाइन राहण्याचे सक्त आदेश आहेत. खबरदारी म्हणून विदेश, तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांनी प्रशासनाला स्वत: माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असले तरीही काही लोकं धार्मिक ठिकाणाचा आसरा घेत चंद्रपुरात लपून असल्याची माहिती आज प्रशासनाला मिळताच एकच खळबळ उडाली होती असे खात्रीलायक वृत्त आहे.

या सर्व व्यक्तींना चंद्रपूर शहरातील मूल रोड वरील वन अकादमीच्या हॉस्टेल मध्ये स्वतंत्र खोलीत होम क्वॉरेंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असून त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

सर्व राज्य व जिल्हा सीमा सुद्धा 21 दिवसांकरिता बंद करण्यात आल्या असून परदेशातून, तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रशासनाकडे नोंद करावी आणि होम क्वॉरेटाइनमध्ये राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत तरीही दोन दिवसांपूर्वी वडगाव येथून 2 व आज तुकूम येथून 11बाहेरून आलेल्या व्यक्तींना प्रशासनाला हुडकत जाऊन ताब्यात घ्यावे लागले हे धोकादायक आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share