WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

'एनपीआर' आणि जनगणनेचा पहिला टप्पा पुढे ढकलण्याचा निर्णय.

Image

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने आज राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि जनगणनेचा पहिला टप्पा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वनियोजनानुसार या मोहिमांची सुरुवात एक एप्रिलला होणार होती.

कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्याचा उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी काल (ता. २४) रात्री जनतेला विश्वासात घेत देशभरात लॉकडाउन जाहीर केला. त्यामुळे सर्व कार्यक्रम लांबणीवर पडले आहेत. २०२१ ला होणाऱ्या जनगणनेचे काम दोन टप्प्यांत होणार होते. एप्रिल ते सप्टेंबर या काळात घर नोंदणी आणि घरांची गणना करण्याचे काम होते. याच काळात लोकसंख्या नोंदणीही केली जाणार होती.

तसेच, पुढील वर्षी ९ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा पार पाडला जाणार होता. या कामांसाठी घरोघर जाणे आवश्यक असल्याने आणि सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याने ही मोहीम लांबणीवर टाकण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. वास्तविक, या दोन्ही मोहिमांची तयारी पुर्ण झाली असल्याचे मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. 'एनपीआर' ला अनेक राज्यांचा विरोध आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, बिहार, केरळ आणि पश्चिम बंगाल यांनी आपापल्या विधानसभेत ठराव करून विरोध केला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share