WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोदी सरकारच्या ‘लॉकडाउन’ला यश, भारतातील करोनाग्रस्त वाढण्याचा वेग मंदावला .

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसावे असं आवाहन मोदींनी केलं आहे. करोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसांच्य लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या आकडेवारी लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या कमी प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी दुपारी बारावाजेपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढला. बुधवारी दुपारी देशामध्ये ५३९ करोनाग्रस्त रुग्ण होते. हीच संख्या मंगळवारी ६७ ने वाढला होता.जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारहून आधिक झाली.

देशामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक राज्यांचा क्रमांक लागतो. केरळमधील कासारगौड तर महारष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर कर्नाटकमध्ये बेंगळुरु जिल्ह्यात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण अढळून आले आहेत. करोनाने ईशान्य भारतामधील राज्यांमध्येही शिरकाव केला असून मंगळवारी दुपारपर्यंत मणिपूर आणि मिझोरममध्ये प्रत्येकी एक रुग्ण अढळून आळा होता. ईशान्येमधील इतर राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण अद्याप सापडलेले नाहीत. मंगळवार दुपारपर्यंत म्हणजेच लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर सोळा तासांनंतर गोवा आणि झारखंडमध्ये करोनाचा एकही रुग्ण अढळून आला नव्हता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share