WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोनामुळे पुणे-नागपूर, नागपूर ते सिंदेवाही एका तरुणांचा संघर्षमय पायदळ प्रवास

Image

•गेल्या दोन दिवसापासून पोटात अन्नाचा एकही कन नाही, तरी देखील गाव गाठले.....!!

प्रतिनिधी/ गौतम-संघर्ष (चंद्रपूर)

महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूजन्य (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यात सर्वत्र राज्यासह जिल्हात संचारबंदी असल्याने या युवकांवर वेळ फार वाईट आली. पुणे-नागपूर आणि नागपूर ते सिंदेवाही असा पायदळ आणि तेही उपाशापोटी प्रवास त्याला करावा लागला. अशी बातमी कळताच शहरातील नागरिकांनी खेद व्येक्त केला..

आज रात्री १० वाजता नरेंद्र विजय शेळके रा. जांब ता. सावली

येथील हा युवक रहिवाशी आहे. नरेंद्र हा पुणे येथून नागपूर ला आला येथे त्याला जिल्हा बंदी असल्याने पुढे जायचं कसा हा प्रश्न पडला. रस्त्यावर एकही वाहने धावत नसल्याचे बघून तो हतबल झाला. त्यानंतर त्याने नागपूर येथून सिंदेवाही पर्यंत पायदळ जाण्याचा निर्णय घेत नरेंद्र गावी आला.

दरम्यान, सिंदेवाही येथील शिवाजी चौकात गस्ती घालीत असलेल्या पोलिसांना हा आढळून आल्याने त्याला सर्वात आधी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. हा युवक गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्न नसल्याने त्याला पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांना सांगण्यात आले. पि.एस.आय नेरकर यांनी आपल्या घरून जेवण बोलावून त्याला आधी जेवण दिले. त्यानंतर त्याची विचारपूस करून नरेंद्र शेळके याला त्याचे गावी पोहोचविण्याची व्यवस्था केली. नरेंद्र यांनी कृतज्ञ होत सिंदेवाही पोलिसांचे आभार मानले. ही बातमी सिंदेवाही परिसरात पसरताच येथील सर्व नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले. आणि सहकार्याची भावना व्यक्त केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share