WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अखेर मार्डी येथील दारु दुकान शिल, राज्य उत्पादन शुल्क विभागाची बेधडक कारवाई

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम मेश्राम)

मारेगाव- कोरोना साथ आजाराची व्याप्ती रोखण्यासाठी शासनाच्या वतीने गर्दी प्रतिबंधित करण्यात आली आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी गावातील जिवनावश्यक वस्तुचे दुकान वगळता देशी दारूचे दुकान, बार, रेस्टॉरंट तथा संपूर्ण दुकाने बंद करण्याचे आदेश असताना मात्र मार्डी येथील देशी तथा विदेशी दारूचे दुकान राजरोसपणे सुरु होते, शेकडो ग्राहकांच्या गर्दी बाबत गोपनीय माहिती जिल्हाधिकारी यवतमाळ, राज्य उत्पादन शुल्क जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ यांना देण्यात आली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत प्रशासनाने येथील देशी दारू दुकान बार व रेस्टॉरंट ला शिल ठोकण्यात आले आहे. देशात कोरोना या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी शासनाच्या वतीने गर्दी प्रतिबंधित करण्यात आली आहे. गावातील जिवनावश्यक वस्तुचे दुकान वगळता संपुर्ण दुकाने बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने स्थानिकाना दिला. मात्र बंदच्या काळात अधिक कमाईच्या मोहाने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवैधरीत्या व्यवसाय सुरू होता. यामुळे गावात यात्रेचे स्वरुप आले असताना साथ आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या शासनाच्या प्रयत्नाला ईथे अपयश येण्याच्या शक्यतेने मार्डी येथील सरपंच रविराज चंदणखेडे व पोलिस पाटिल डॉ. पाटिल यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते मात्र, तालुका प्रशासन यामध्ये हतबल ठरल्याने वरीष्ठ कार्यालयात सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेवुन जिल्हा प्रशासनाने येथील बार, रेस्टारट व देशी दारुचे दुकान शिल करण्यात आले ही कारवाई मारेगावचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चमुसह सरपंच रविराज चंदणखेडे, पोलिस पाटील डॉ. प्रशांत पाटील यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share