WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तेलंगणा ते कोरपना दीडशे किमीचा प्रवास पायदळ

Image

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील राजन गट्टा गावातील बारा मजूर चना व गहू कटाईच्या कामासाठी तेलंगणा राज्यातील बोथ येथे गेले होते. संचारबंदी लागू झाल्यानंतर त्यांची कुठलीच राहण्याची व्यवस्था न करता शेतमालकाने परतून लावले. त्यांनी १५० किलोमीटरचा पायदळ प्रवास करत कोरपना गाठले. येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून स्वगावी जाण्याचीही व्यवस्था करून दिली.तेलंगणातून आलेल्या मजुरांची भेट जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली यांच्याशी कोरपना बसस्थानक परिसरात झाली. त्यांनी जाण्यासाठी पैसा नाही. धान्य नाही. सकाळपासून उपाशीच पायदळ चालत आलो आहे, अशी परिस्थिती कथन करून पुन्हा अर्धा प्रवास गाठणे कठीण आहे, असे सांगितले. यातील तीन व्यक्ती वृध्द असल्याने याबाबतची माहिती अली यांनी कोरपनाचे ठाणेदार अरूण गुरनुले यांना दिली. मजूर उपाशी असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था आबीद अली यांनी अबरार अली व नगरसेवक सोहेल अली यांच्या सहकार्याने देवघाट येथे करून दिली. त्यानंतर पोलिसांकडून गावी जाण्यासंबंधी पत्र देऊन जाण्याची व्यवस्था केली. यावेळी नईम शेख, शादाब अली, नौशाद अली, शहेबाज अली आदींनी सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share