WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्टेट बँके पांढरकवडा शाखेने ग्राहकांना शुद्ध पीण्याचे पाणी उपलब्ध करून दिले व हात धुवायला सॅनिटायझर!

Image

ग्राहक प्रहार संघटनेने तू तू मै मै केल्यावर पाणी व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले !

शासन स्तरावरून होणार चौकशी !

आज दुपारी पांढरकवडा स्टेट बँकेत ग्राहकांची लांबच लांब रांग लागलेली होती .ह्या कडे ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष दामोदरजी बाजोरिया ह्यांनी सहकारी प्रसाद नावलेकर ह्यांचे निदर्शनास आणून दिल्याने ,त्यांनी शाखा व्यवस्थापक ह्यांचे निदर्शनास वरील बाब आणून दिली असता शाखा व्यवस्थापक म्हणाले कोणी सांगितल्यावर आम्ही ऐकणार नाही एक बाटली काल पाणी ठेवले होते आजही ठेवील ,ह्यावर ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयाशी संपर्क केला असता त्यांनी तहसीलदार सोबत संपर्क करण्यास सांगितले व तक्रारीची दखल न घेतल्यास येथून शिष्टमंडळ पाठवू असे सांगितले ह्या बाबत तहसीलदार सुरेशजी कव्हळे ह्यांचे कडे तक्रार केली असता लगेच एक थंड पाण्याचे बॅरल ग्राहकांना पाणी पिण्यास उपलब्ध करून दिले .ग्राहकाने बँकेत यायच्या आधी सॅनिटारीं ने हात धुवून आत यावे असे निर्देश असतांना एक अत्यंत खराब साबण ठेवला होता व अर्धी बदली पाणी! त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यावर ते म्हणाले कोऑप रेटीव्ह बँका ग्राहकांना काय देत आहे त्याची पाहणी केल्यावर पाहू असे उदाम उत्तर दिले ! ह्या बाबत तहसीलदार सुरेशजी कव्हळे ह्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत जाधव ह्यांना प्रत्यक्ष पाहणी करून योग्य समज देण्यासाठी पाठविले त्यांनी शाखा व्यवस्थापक ह्यांना योग्य सूचना देऊन ग्राहकांना गैरसोय होणार नाही ह्याची काळजी घ्यायला सांगितले तसेच ग्राहकांना उन्हात उभे ठेवू नका आत जागा असतांना असे का ? दोन काऊंटर सुरू करून घेतले बँकेतील गर्दी लगेच कमी झाली .तसेच सॅनिटायझर चा वापर लगेच सुरू करण्यात आला. कोरोना बाबत संपूर्ण देश चिंतीत असतांना तुम्ही ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी असे कसे वागू शकता असा प्रश्न उपस्थित करून चांगल्या सुचनेचे स्वागत करण्याचे सांगितले .

ग्राहक प्रहार संघटने च्या काहीपदाधिकाऱ्यांनी नामदार बच्चूभाऊ कडू ह्यांचे कानावर हा प्रकार टाकला असून ते पांढरकवडा भेटीवर येणार असल्याचे कळले .

ह्या बाबत सामान्य ग्राहक सुखावला !

ग्राहक प्रहार संघटनेचे इतर पदाधिकारी झालेल्या प्रकाराने संतप्त झाले असून स्टेट बँकेच्या उचपदस्त अधिकाऱ्यांना भेटायला यवतमाळला जाणार असल्याचे ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम ह्यांनी कळविले आहे

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share