WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतात करोनाग्रस्तांची संख्या ८३४, आत्तापर्यंत १९ जणांचा मृ्त्यू.

Image

करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन पुकारला आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देभशरात ७५ रुग्ण वाढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

जगाचा विचार केला तर इटलीमध्ये करोनाचा कहरच सुरु आहे कारण मागील चोवीस तासांत इटलीमध्ये १ हजार लोकांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेत १८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. भारतात १४ एप्रिल पर्यंत म्हणजेच २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share