WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

खुशखबर ! अवघ्या पाच मिनिटांत होणार कोरोनाची चाचणी!

Image

अमेरिकेतील अबॉट लॅबोरेटरिजने कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी एक सोपी चाचणी उपलब्ध करून दिली आहे. या चाचणीच्या माध्यमातून अवघ्या पाच मिनिटांत या विषाणूची लागण झाली आहे की नाही समजते. त्याचबरोबर ही चाचणी करणारे उपकरणही हाताळण्यास एकदम सोपे आहे. ते कोणत्या रुग्णालयात, दवाखान्यामध्ये सहज ठेवता येऊ शकते.

येत्या एक एप्रिलपासून रोज अशी ५० हजार उपकरणे उपलब्ध करून देण्याचे अबॉट लॅबोरेटरिजने म्हटले आहे.अबॉट लॅबोरेटरिजचे उपाध्यक्ष जॉन फ्रेल्स यांनी याविषयी माहिती दिली आहे. रुग्णाच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्यास आणि त्याचे प्रमाण जास्त असल्यास या उपकरणाच्या माध्यमातून पाच मिनिटांत ते समोर येऊ शकते. अन्यथा ही चाचणी पूर्ण करण्यास १३ मिनिटांचा कालावधी लागू शकतो असे जॉन फ्रेल्स यांनी म्हटले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share