WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेतातील तारेचे कुंपण ठरले, महिलेसाठी जीवघेणे

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

सिंचनाच्या माध्यमातून काळ्या आईला वर्षभर हिरवा शालू पांघरण्याचा बेत आखून आपल्या उत्पादनात भरघोस वाढ व्हावी या सकारात्मक दृष्टीने शेतात भाजीपाला पिकविला. त्याला पांघरून घालण्यास तारेचे कुंपण केले. मात्र हे तारच शेतकरी महिलेचे जीवघेणे ठरल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील खंडणी येथे सोमवारी सकाळी आठ वाजता घडली. जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने झालेल्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील खंडणी शेतातलगत मारेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत जंगल असून शिवारातील उभे पीक वन्यप्राणी नेहमीच फस्त करीत असतात. म्हणून शिवारातील शेतात बहुतांश शेतकऱ्यांनी शेताला तारेचे कुंपण केले आहे. येथील रामपुरे शेतकऱ्याने भाजी पाला लागवड करून भाजीपाला सभोवताल तारेचे कुंपण केले. नेहमी प्रमाणे विक्रीकरिता भाजी तोडण्यासाठी गेलेल्या अन्नपूर्णा भुतु आत्राम (४५) भाजी तोडून तारेच्या खालून जाण्यास निघाली मात्र, तारेला जिवंत विद्युत प्रवाह असल्याने काही कळण्यापूर्वीच शेतकरी महिलेचा करून अंत झाल्याची दुर्देवी घटना घडली. सदर घटनेने खंडणी शिवारात हळहळ व्यक्त होत असून मृतक महिलेच्या पश्चात पती दोन मुले, दोन मुली,नातवंड असा परिवार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share