WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चीनमध्ये मांसविक्रीच्या बाजरपेठा पुन्हा सुरु; कुत्रे, मांजरी, वटवाघूळाच्या मांस खरेदीसाठी हजारोंची गर्दी.

Image

वटवाघूळ आणि विंचवाच्या अवयवांचा समावेश असलेल्या पारंपारिक औषध विक्रीलाही सुरुवात

चीनमधील वुहान शहरामधील मांसविक्री केल्या जाणाऱ्या बाजारपेठेमधून प्रादुर्भाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. जगभरातील १८३ देशामध्ये करोनाचा विषाणू पसरला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने ३१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र असत असतानाच चीनमध्ये मात्र परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. म्हणूनच तेथील सरकारने आता मांस विक्री करणाऱ्या बाजारपेठा पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा वटवाघूळ, कुत्रा, मांजरी, सशांचे मांस विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. या बाजारपेठा सुरु होताच येथे नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचेही वृत्त आहे. वटवाघूळ आणि खवल्या मांजराच्या मांसांमधून करोनाचे संक्रमण मानवामध्ये झाल्याचा अंदाज काही संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे संपूर्ण जग करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी लॉकडाउनच्या माध्यमातून घरी बसलेलं असताना दुसरीकडे चीनने मांसविक्री सुरु करण्याची पवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यात यश आल्याने चीनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चीनमधील वेगवेगळ्या शहरांमधील मांस विक्रीच्या बाजारपेठा पुन्हा सुरु झाले आहेत, असं डेली मेलने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. या बाजारपेठांमध्ये वटवाघूळ, कुत्री, मांजरी, ससे यांचबरोबर किड्यांची विक्री पुन्हा सुरु झाल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share