WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अवकाळी वादळी वाऱ्याने घराची छत उडाली,

Image

अवकाळी वादळी वाऱ्याने घराची छत उडाली, माथार्जुन येथील घटना

•संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची पाहणी करावी, गावकऱ्यांची लाभार्थ्यांना तत्काळ मदतीची केली मागणी

प्रतिनिधी/ योगेश मडावी (झरी)

झरी तालुक्यातील माथार्जुन येथील राहत्या घराचे छत वादळी वाऱ्याने उडाली आहे. जगभऱ्यात कोरोना विषाणू चा संसर्ग प्रसार वाढत असून अवकाळी वादळी पावसाने मधातच आपली एन्ट्री केली. त्यामुळे माथार्जुन येथील राहत्या घराचे छत उडून गेली आहे.

सूत्राच्या माहितीनुसार दि.30 मार्च रोजी रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास जोरदार वारा आला अचानक या वादळी वाऱ्याने काही सुचू दिले नाही त्यातच पावसाने ही जोरदार हजेरी लावली होती. या मिश्र वादळ वारा आणि पाऊस आल्याने अनेक घरांची, बैल गोठ्या चे मोठे नुकसान झाले.

या अवकाळी वादळामध्ये अनिता वासुदेव तोडसाम (वय 32) ती अपंग आहे. त्यांची मुलगी कस्तुरी वासुदेव तोडसाम (वय 8) व कमलाबाई दौलत चव्हाण (वय 49) ही विधवा यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र घराचे छत्र हरवल्याने राहायचं कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये घराचे टिनपत्रे उडून गेले आहे. या आपत्तीजनक वादळीवारा व पावसाने गावाचे ही मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसल्याने खायचं काय असा प्रश्न असल्याने घराची दुरुस्ती करायची कशी या चिंतेने तोडसाम व चव्हाण कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने तात्काळ या घटनेचा दौरा करून लाभार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी गावातील नागरिकांनी मागणी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share