WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विदर्भात ८९७ नमुन्यांमधून २३ पॉझिटिव्ह

Image

विदर्भातून आलेल्या ८९७ नमुन्यांची तपासणी केली असता आतापर्यंत ८७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर २३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


नागपूर : विदर्भातून आलेल्या ८९७ नमुन्यांची तपासणी केली असता आतापर्यंत ८७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर २३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यात मेयो व मेडिकल मिळून ५६५ नमुन्यांमधून १६, यवतमाळमधील २७ नमुन्यांमधून तीन, गोंदियामधील १६ नमुन्यांमधून एक तर यवतमाळमधील २३ नमुन्यांमधून तीन नमुने पॉझिटिव्ह आहेत. विशेष म्हणजे, सोमवारी खळबळ उडवून दिलेल्या कोरोना संशयित मृताचे नमुनेही मंगळवारी निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर येथील ५५ वर्षीय रुग्ण गेल्या पाच दिवसांपासून नागपूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होता. रुग्णाला सर्दी, खोकला व दम लागत होता. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यात न्युमोनियाची लक्षणे दिसून आली. रुग्णाला कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी मेयो रुग्णालयात सोमवारी दुपारी ४ वाजता पाठविण्यात आले. परंतु दोन तासातच रुग्णाचा मृत्यू झाला. या मृत्यूचा धसका सर्वांनीच घेतला. नमुन्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी अहवाल निगेटिव्ह येताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी आलेल्या १०१ नमुन्यांमधून ९९ नमुने निगेटिव्ह आले, तर बुलडाण्यातील दोन नमुने पॉझिटिव्ह आले.
येथे पॉझिटिव्ह नाही
अमरावतीमधून ७१, वर्धा येथून १७, सेवाग्राम येथून सहा, सावंगी वर्धा येथून एक, अकोला येथून ३०, चंद्रपूर येथून नऊ, वाशिम येथून एक, खामगाव येथून सहा, गडचिरोली येथून २०, भंडारा येथून सात, सैनिक हॉस्पिटलमधून एक, लता मंगेशकर हॉस्पिटलमधून एक, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमधून दोन, एम्समधून एक, छत्तीसगडमधून १९ तर मध्य प्रदेशातून आलेल्या आठ नमुन्यात एकही पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share