WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

२७ लाख नागरिकांच्या दारावर ‘आशा’ देणार दस्तक

Image

यवतमाळ : कोव्हीड-१९ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील २७ लाख नागरिकांचे दररोज ‘डोअर टू डोअर’ सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारपासून या सर्व्हेक्षणाला गावपातळीेवर सुरूवात झाली आहे. कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
छोट्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा यांच्या मदतीने हा सर्व्हे केला जात आहे. तर मोठ्या गावामध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका मदतीला आहे. हा सर्व्हे पूर्ण करताना सर्दी, खोकला आणि ताप याची स्वतंत्र कॅटेगरी करण्याचे आदेश आहेत. तर कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीचा स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आला. या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ तालुक्याला ‘रेफर’ करण्याच्या सूचना आहेत.
हे सर्व्हेक्षण पार पाडणाºया वक्तीची आरोग्य विभाग विशेष काळजी घेणार आहे. त्यांना मास्क, सॅनेटायझर पुरविले जाणार आहे. गोळा झालेली माहिती दररोज अपडेट करून ऑनलाईन पाठविण्याच्या सूचना आहे. यामुळे गावात कुठला नवीन रूग्ण आढळल्यास तत्काळ माहिती मिळणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share