WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? महाराष्ट्रात सद्यास्थिती काय? घ्या जाणून!

Image

कोरोना व्हायरस (Coronavirus) आपला प्रादुर्भाव वाढवत आहे. संपूर्ण देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या पाहता इतर राज्यांच्या तुलनेत ती महाराष्ट्रात अधिक आहे. असे असले तरी सोशल मीडिया आणि अफवांच्या माध्यमातून ही संख्या काहीही सांगितली जात आहे. लेटेस्टली मराठीने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची जिल्हानिहाय संख्या तपासली. ही अचूक आणि अधिकृत संख्या आम्ही येथे देत आहोत.

पाहा कोणत्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या किती?

कोविड - 1 9 महाराष्ट्र राज्याची जिल्हा / मनपा निहाय सध्या स्थिती

(आकडेवारी 31 मार्च सायंकाळी 6 पर्यंतची)

अ . क्र . जिल्हा / मनपा बाधित रुग्ण मृत्यू

1 मुंबई 151 7

2 पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) 48 1

3 सांगली 25 0

4 मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा 36 1

5 नागपूर 16 0

6 अहमदनगर 8 0

7 यवतमाळ 4 0

8 बुलढाणा 3 1

9 सातारा 2 0

10 कोल्हापूर 2 0

11 औरंगाबाद 1 0

12 रत्नागिरी 1 0

13 सिंधुदुर्ग 1 0

14 गोंदिया 1 0

15 जळगाव 1 0

16 नाशिक 1 0

17 इतर राज्य :- गुजरात 1 0

एकूण 302 10

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार खंबीर आहे. आपण फक्त सहकार्य करा. गर्दी टाळा. आरोग्य, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर अधिक भार टाकू नका, असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला वारंवार केले आहे. आजच्या पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे यांनी जनतेला हेच आव्हान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, नागरिकांनी जिवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी करु नये. राज्याकडे आवश्यक तितक्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share