WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना आपत्ती काळात होमोपॅथिक डॉक्टरांना आरोग्य सेवेत संधी द्या- डॉ. किरण पाचभाई

Image

•डॉ. पाचभाई यांची मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

प्रतिनिधी/ संघर्ष भगत (झरीजामणी/यवतमाळ)

जगभरात कोरोना महारोगांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यात सुद्धा हा विषाणू वनव्यासारखा पसरताना दिसत आहे. आरोग्य विभाग सर्वाना काढजी घ्या आणि घरातच राहा, संपर्कात येऊ नका, असा संदेश देताना दिसत आहे. मात्र जनतेला याचे गांभीर्य कळत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पण खाजगी डॉक्टरांना हे कळून चुकले की आपण घरात न राहता देश सेवा करावी या उदात्त हेतूने प्रेरित होऊन डॉ. किरण पाचभाई यांनी मुख्यमंत्र्यांना व आरोग्य मंत्र्यांना पत्रा द्वारे BHMS डॉक्टर यांना कोरोना आप्पती काळात आरोग्य यंत्रणेत समाविष्ट करून संपूर्ण होमोपाथिक डॉक्टरांची मदत कोरोना विषाणू रोखण्यासाठी होईल. आरोग्य यंत्रणेत अनेक पदे रिक्त आहे. त्यात सुद्धा भर होईल.

सध्या च्या काळात आपल्याला खाजगी रुग्णालये बंद दिसत आहे. यातच डॉ. पाचभाई यांनी आपल्याला देशाची सेवा करण्याची संधी मागताना दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share