WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चौथ्या दिवशी मुख्य मंत्र्यांच्या प्रतिनिधी मंडळाने केली उपोषणाची सांगता....

Image

यवतमाळ जिल्ह्याचा एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही.... ना किशोर तिवारी.....
नोव्हेंबर अखेर पर्यंत वणी, झरी च्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही तर राष्ट्रवादी पुन्हा आंदोलन करेल, ही लढाई अजून कायमच .... डॉ लोढा...

सुरज चाटे वणी: आज गुरूवारी शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय पिदूरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यात त्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत पीक कापणीचा सर्वे असल्याचे सांगत याचा अहवाल डिसेंबर महिन्यात येणार. यात वणी, झरी सह उर्वरीत तालुक्यांच्या समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत केला जाईल असे लिखित आश्वासन दिले. त्यानंतर डॉ. महेंद्र लोढा यांनी उपोषण मागे स्थगित करत असल्याचे जाहीर केले. किशोर तिवारी यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन हे उपोषनाची सांगता करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधी मंडळाच्या शब्दावर व लेखी आश्वासणावर विस्वास करीत उपोषणाची सांगता करण्यात आली.

आज उपोषणाचा चौथा दिवस होता. सकाऴी साडे दहा वाजता शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन उपोषणस्थळी पोहोचले. त्यांनी सर्व 60 उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी डॉ. लोढा त्यांच्याशी सर्व मागण्यांवर चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी सर्व मागण्या मान्य करत 30 नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या सर्वेक्षणाची वाट बघण्याची विनंती केली. या सर्वेक्षणानंतर डिसेंबर महिन्यात संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करू असे आश्वासन दिले. सोबतच सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मी स्वत: एक शेतकरी पुत्र म्हणून आमदार बोदकुरवार यांच्यासह तुमच्यासोबत उपोषणास बसेल असे जाहीर केले.

आलेल्या मुख्य मंत्र्यांच्या प्रतिनिधीला डॉ लोढा यांनी वणी झरी व यवतमाळ परिसरातील शेतकऱ्यांना परतीचा पाऊस न पडल्याने मोठे नुकसान झाले आज शेतीत सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली सुरवातीला 2 ते 4 दिवसाच्या सततच्या पावसाने कपाशीचे पीक उठून आले होते परंतु परतीचा पाऊस न झाल्याने हे कपाशीचे पीक सुद्धा एकरी उत्पादन देणार नाही असे दिसत असल्याने आत्महत्या ग्रस्त ओडखल्या जाणारा हा जिल्हा पुन्हा आत्महत्यांच्या संख्येत वाढ होणार असेच चिन्ह दिसत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या शिष्ट मंडळा ला बोलून दाखविले. शेतकऱ्यांच्या परिस्थिती वर प्रतिनिधी मंडळानेही दुजोरा देत आज यवतमाळ जिल्ह्याला शासकीय मोठ्या मदतीची गरज असल्याचे मान्य केले.

शिष्ट मंडळाच्या आश्वासनानंतर डॉ. महेंद्र लोढा यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले व जर डिसेंबरपर्यंत वणी, झरीसह जिल्ह्यीतील इतर तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले नाही तर अन्नत्याग सोबतच जलत्यागही करू असा इशारा दिला. त्यानंतर झरी तालुक्यातील सर्वात वयोवृद्ध शेतकरी आत्महत्या ग्रस्त परिवारातील शेतकरी नामे अजाबराव आरके यांना किशोर तिवारी यांनी नारळपाणी देऊन त्यांचं उपोषण सोडवले. त्यानंतर डॉ. महेंद्र लोढा आणि इतर शेतकरी व पदाधिकारी यांना नारळ पाणी देऊन आदींचे उपोषण सोडविण्यात आले, नव्हेबर अखेर पयेन्त वणी झरी च्या शेतकऱ्याच्या समस्या सुटणार असे लेखी दिले असे न झाल्यास किशोर तीवारी , आमदार संजयरेड्डी बोदकुरवार राष्टवादीच्या डॉ. महेन्द लोडा याच्यासोबत आमरण उपोषणावर बसणार असे लेखी मुख्यमत्राच्या शिष्टमंडळाणी दिल्याने यावर विश्वास करीत आम्ही हे आमरण उपोषण मागे घेत आहो पण ही लढाई अजुन कायम आहे ही समस्या सुटली नाही तर राष्टवादी आपली लढाई लढणारच असे डॉ. लोडा यानी दै. देशोन्नतीशि बोलताना सांगितले.

उपोषण संपताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सर्व उपोषणकर्त्यांचे हार टाकून अभिनंदन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीन या रॅलीचा समारोप राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाला.

डॉ. महेंद्र लोढा ठरले शेतकऱ्यांचे कैवारी

आजपर्यंत केवळ निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आवाज उठवत होते. उपोषणासारखे हत्यार केवळ कम्युनिष्टांकडून उपसले जायचे. मात्र पहिल्यांदाच सुशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित व्यक्ती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपोषणाला बसले. हा एक महत्त्वाचा संदेश या उपोषणातून परिसरात गेला आहे. जे इतर पक्षाला जमलं नाही ते अलिकडेच राजकारणात आलेल्या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने उपोषणासारखे हत्यार शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी उपसल्याने तसेच हे आंदोलन यशस्वी करून दाखवल्याने पक्षात आणि नेत्यांमध्ये धडकी भरली आहे, परंतु शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण दिसून आले .

यवतमाळ जिल्ह्यातील एकही शेतकरी शासनाच्या मदती पासून वंचित राहणार नाही .....किशोर तीवारी

या वेळी महाराष्ट शासना कडून आमरण उपोषणाशी चर्चा करन्याकरिता आलेल्या कीशोर तीवारी यानी यवतमाळ जिल्ह्यातील एकही शेतकरी शासनाच्या मदती पासुन वंचीत राहणार नाही असा शब्द देत डिसेंबर अखेर पर्येन्त शेतकऱ्याचा प्रश्न निकाली निघणार असे त्यांनी सागीतले शब्द देत यवतमाळ जिल्ह्यातील एकही शेतकरी शासनाच्या मदती पासून वंचित राहणार नाही असे यावेळी बोलून दाखवले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share