WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कर्तव्यासह सामाजिक बांधिलकीतुन गरजुंना मदत मुकुटबन पोलीस प्रशासनाच्या वतीने जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

Image

कर्तव्यासह सामाजिक बांधिलकीतुन गरजुंना मदत...!!

मुकुटबन / संघर्ष भगत

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असुन देशासह राज्यातही कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळुन आले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढतच चालला आहे. या रोगाला नियंञित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन व आरोग्य यंञना जीवाचे रान करुन जनजाग्रुतीसह समाजकार्य करित आहेत.

असेच कर्तव्यातुन समाजकार्य करत असल्याचे मुकुटबन मध्ये सुद्धा दिसुन येत आहेत.

मुकुटबन परिसरातील खाजकी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करुन कर्तव्यासह सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विशेष म्हणजे मुकुटबन पो.स्टे चे पोलीस कर्मचारी निरज पातुरकर गोपनीय विभागाचे कर्मचारी व स्वप्निल बेलखेडे मुकुटबन टाउनचे जमादार यांच्या स्वतःच्या वेतनातुन मुकुटबन परिसरातील खाजगी कंपनीच्या मजुरांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले आहे.

•शासनाच्या आदेशाचे पालन करा.....

शासनाच्या आदेशानुसार सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच जिवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुरु असल्यामुळे नागरीकांनी त्या वेळेतच घराबाहेर निघावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल अशी सुचना ठाणेदार सोनूने यांनी केली आहे.

व यावेळी अत्यावश्यक सेवा पुरवताना मुकुटबन पोलीस स्टेशन कर्तव्य दक्ष ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुलभ उईके, प्रदीप कैराशे, मोहन कुडमेथे, मनोहर कुंभरे, रमेश मस्के, जितेश पानघाटे, अशोक नैताम पुरुषोत्तम घोडाम व होमगार्ड-प्रज्योत ताडुरवार, निखिल मोहितकार, निकेश घुगुल, अविनाश वाघाडे, व आदी कर्मचारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share