WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाना"केली मदत, वणी येथील आदिवासी समाजाचा स्तुत्य उपक्रम

Image

•मोलमजुरावर आली उपास मारीची वेळ....!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव-यवतमाळ)

वणी येथील अनेक कुटुंब मोलमजुरीसाठी वणी तालुक्यात आले आहे परन्तु संचार बंदी असल्याने व वणी तालुक्यातील मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा वणी शहरात अनेक कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न उपस्थित झाला असतांना अशा मोलमजुरी करण्याऱ्या कुटुंबाला "आदिवासी समाजाच्या" मार्फत जीवनावश्यक वस्तूची १४० आटा बेगिचे वाटप करण्यात आले.

वणी तालुक्यातील कुटुंबाच्या सदस्यांना हाताला काम नसल्यामुळे कामाच्या शोधात अनेक कुटुंब वणी तालुक्यात आले होते. तालुक्यात फिरून दिवसभर जे काम मिळेल ते काम करायचे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असा त्यांचा नित्यक्रम सुरू होता, असे सुरू असताना कोरोना वायरस च्या प्रादुर्भावामुळे देशात १४ एप्रिल पर्यंत 'लोकडाऊन' असल्यामुळे वणी शहरातील अनेक कुटुंब उघडल्यावर पडले आहे. त्यामुळे त्यांच्या जवळ रोजगार नसल्याने जगण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. ही बाब तालुक्यातील श्रीकृष्ण मडावी, भगवान आत्राम, टेनिन मडावी, कुंदाताई कुमलकर, मायाताई मुरसकोल्हे सुनिताताई, दात्ता मालगडे संतोष चांदेकर यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी जवळपास एका कुटुंबाला प्रत्येकी पाच किलो आटा पाकिट वाटप केले. जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या प्रसंगी वणी येथील आदिवासी समाजातील कार्यकर्ते रमेश जी मडावी, शंकर किनाके, ऍडोव्हकेट सिडाम सर, मनोज केळकर, पतृ उईके, गजु मडावी, रानु तुमराम, गोलु उईके, अमन मडावी यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share