WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महिलेने रात्र काढली उपाशी पोटी,"लॉकडाऊन" मुळे आली उपासमारिची वेळ

Image

प्रतिनिधी/ योगेश मडावी (झरी)

भारतामध्ये कोरोनाचा व्हायरस वाढता प्रभाव लक्षात घेता सरकारने 'लॉकडाऊन'चा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला. हातांवर आणून खाणाऱ्या च्या जिवावर बेतलं आहे. सरकार काही ना काही लोकात जनजागृती करित आहे मात्र पोटाची खळगी भरण्यासाठीचे दृष्य कुठे पहायला मिळत नाही आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार माथार्जुन येथील एका महीलेला जिवनावश्यक वस्तुचं घरी नसल्याने फुलाबाई टेकाम या महिलेला "रात्र" उपाशी काढावी लागली. हे बाब माहीत होताच गावातील श्री. प्रकाश गेडाम, (पो. पाटील) श्री. शरीफ शेख (तंटामुक्ती अध्यक्ष) रास्त दुकानदार क्षणाचा विलंब न करता जिवनावश्यक सामानाची घरपोच व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव थांबवण्यासाठी माथार्जुन ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटीझर गावातील अंगणवाडी सेविका रितीताई तुमराम, लता ताई सिडाम, आशावर्कर मायाताई मरस्कोल्हे यानां वाटप करण्यास दिले असून गावामध्ये वृद्ध गावकऱ्यांला कोरोना विषाणूं पासून स्वत: व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्याची आहे. दरम्यान गावामध्ये सॅनिटीझर वाटप करत असताना सांगितले जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share