WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगाव येथे ९१६ जण होम क्वारंटाईन

Image

मारेगाव : तालुक्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत असून विदेशातून आलेल्या दोन नागरिकांसह ९१६ नागरिकांना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी २५४ जणांचा १४ दिवसांचा कालावधी संपला आहे.
तालुकापातळीवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाच्या तीन चमू प्रयत्न करीत आहेत. तालुक्यात मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागातून एकूण ९१६ नागरिक आलेले आहेत. यांपैकी दोघे काहीकाळ आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, तर उर्वरित नागरिकांना स्वविलगीकरण करण्यास सांगितले आहे. त्यांच्यावर त्या-त्या गावांतील आशा वर्कर व आंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, परिचारिका व आरोग्य अधिकारी लक्ष ठेऊन आहे. बाहेरून गावात येणाऱ्यांची माहिती तात्काळ देण्यात यावी म्हणून सरपंच व पोलीस पाटील यांचीही मदत घेतली जात आहेत. गृह विलगीकरणामध्ये त्यांना १४ दिवस ठेवल्या जाते. आजपर्यंत ९१८ पैकी २५४ जणांचा गृह विलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share