WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Apmc तील बाजार भाजीपाल्याचा की मुर्खाचा.... सोशल डिस्टंसिंग ची ऐसीतैशी....

Image

सागर मुने वणी,

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखन्याचे आव्हान प्रशासनावर आहे राज्य व केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली आणी सारे कामकाज, व्यापार बंद करण्यात आले परंतु जिवनावश्यक वस्तु ला यातुन वगळले त्यामुळे च शहरातील भाजी मंडई सुरू होती परंतु इथे मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने Apmc मध्ये स्थानांतर करणात केले या निर्णयाला व्यापारी,विक्रेत्यांनी हरताळ दिल्यागेल्याचे दिसत असुन हा बाजार भाजीपाल्याचा की मुर्खाचा असे चित्र नजरेस येत आहे.

कोरोणा या संसर्गजन्य रोगाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकार वैद्यकीय क्षमता पाहता स्थानीय पातळीवर जनतेच्या हितासाठी दर मिनिटाला दर तासाला नाना विधी उपाययोजना करीत आहे स्थानीय प्रशासकीय अधिकारी शासकीय आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करीत असून स्थानिक पातळीवर समस्या सोडविण्यासाठी वैयक्तिक स्तरावर लोकहिताचे निर्णय घेत आहे.

असे म्हणतात "कळते पण् वळत नाही" परंतु हि म्हण वणी- करांच्या बाबतीत खरी ठरते असे चित्र निदर्शनात येत आहे वणीकर जनता कोरोना माहामारीला ला अतिशय सामान्य घेत असल्याचे येथील एपीएमसीमध्ये होत असलेल्या गर्दीवरून दिसत आहे वणी शहरात नगरपालिके समोरच भाजीमंडी आहे या मंडी मध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असते मंडीत होणाऱ्या भाजीपाल्याचा लिलाव व चिल्लर विक्रीमुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते कोरोनाचे धर्तीवर ही गर्दी टाळण्यासाठी या मंडीचे स्थानांतरण भव्यदिव्य परीक्षेत्र असलेल्या स्थानिय एपीएमसी मध्ये करण्यात आले व या ठिकाणी भाजीपाल्यांचा लिलाव विक्री सुरू केली यावेळी प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ शरद जवळे , तहसीलदार शाम धणमणे यांनी मुख्याधिकारी संदिप बोरकर यांचे मार्फत शासकीय नियमांची अंमलबजावणी, सोशल डिस्टसिंग ची योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश या ठिकाणी व्यापार करणाऱ्यांना देण्यात आले परंतु कोणत्याही निर्देशांचे पालन या ठिकाणी होत नसल्याचं होत असलेल्या गर्दीवरून निदर्शनात येत असल्यामुळे हा बाजार भाजीपाल्याचा की मूर्खाचा असे म्हणायची वेळ आली आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share