WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चोरट्यांनी फोडले चौपाटी बियरबार ! 50 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास!दिपक चौपाटी परिसरातील घटना

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी - 8788250424

सर्वञ लाकडाउन सुरु असल्यामुळे चोरट्यांनी आपला ‘डाव’ साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दोन दिवसापुर्वी याच परिसरातील गोकुल नगर मध्ये किराणा दुकान फोडुन चोरी झाली होती. हि घटना ताजी असतांनाच आज दि.8 एप्रिल बुधवारी

दिपक चौपाटी परिसरातील प्रसाद किसन पुल्लुरवार यांचे मंजुषा चौपाटी बियर बार फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

संचारबंदीमुळे राज्यभरात बियरबार,वाईन शापी,देशी विदेशी दारु दुकान बंदचे आदेश आहेत. त्यामुळे वणी शहरात सुद्धा संपुर्ण देशी विदेशी दारुचे दुकाने बंद आहेत.त्यामुळे

शहरातील दिपक चौपाटी परिसरातील लालगुडा तलाव रोड वरिल ‘मंजुषा’ चौपाटी बियरबार हा 15 दिवसापासुन बंद आहे.याचाच फायदा घेवुन चोरट्यांनी राञिच्या दरम्यान बार फोडले असावे. बुधवारी सकाळी नोकराने सदर बार कडे फेरफटका मारला असता बियरबार फुटल्याचे त्याच्या लक्षात आले. या घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. परंतु सदर बियर बारला सिल लावुन असल्यामुळे दारुबंदी विभागाच्या अधिकार्यांना पाचारन करण्यात आले होते. दरम्यान

दुय्यम विभागाचे अधिकारी प्रविण मोहितकर दुय्यम निरीक्षक, जवान सतिष घाडगे हे घटनास्थळावर दाखल झाले. तपासादरम्यान चोरट्यांनी सदर बियर बारच्या मागच्या बाजुस काचेच्या खिडक्या तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. परिणामी चोरट्यांनी बियरबार च्या छतावर चढुन दुकानावरिल टिनपञा कापुन आत प्रवेश करुन विदेशी दारुच्या 7 पेट्या अंदाजे किंमत 50 हजार रुपयाचा माल चोरट्यांनी पसार केल्याचे उघडकीस आले. बातमी लिहेपर्यंत तपास सुरुच होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share