WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी,वणी तर्फे राजूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

Image

वणी:मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई. स्कुल वणी चे संचालक श्री.पी.एस.आंबटकर यांच्या वतीने राजूर येथील गरजवंत,विधवा महिला,अपंगांना जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य वाटप करण्यात आले.

कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशभर लॉकडाऊन लागू केले.या आणीबाणीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दुकान सुरु आहेत,मात्र कामगार वर्गाचे काम ठप्प असल्याने उदरनिर्वाहाचे साधन नाही.मग लोकांनी जगायचं कस? यासाठी सामाजिक बांधिलकी राखत अनेक लोक समोर येत आहेत,यातच वणी येथील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई. स्कुल वणी चे संचालक श्री.पी.एस.आंबटकर(चंद्रपूर) यांनी राजूर येथील परिस्थितीचा आढावा घेऊन 100 गरजवंत कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात तांदूळ,डाळ,तेल,तिखट,हळद,साबण यांचे वितरण करण्यात आले.

सामान्य माणसाच्या समस्यांची जाण असलेले श्री.आंबटकर हे चंद्रपूर,बाबूपेठ,राजूर,वणी परिसरातील लोकांना मदतीचा हात देत आहेत.

हा लोक उपयोगी उपक्रम दि.8/4/2020 ला दुपारी 12 वाजता मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी,वणी चे शिक्षक श्री.अजय कंडेवार,श्री.अमोल बावने,श्री.आशिष घनकसार, विक्की ताजने यांनी वितरनासाठी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share