WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागपुरात आई, वडील व मुलाने हरविले कोरोनाला : मेडिकलमधून मिळाली सुटी

Image

: नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, वडिलांना पक्षाघात झाला होता. त्या स्थितीतही त्यांनी कोरोनाशी लढा दिला. यात त्यांना मेडिकलच्या डॉक्टरांची मोठी मदत झाली.

या तिघांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. भरतीच्या सातव्या दिवशी व १४ दिवसांनंतर २४ तासांच्या कालावधीत तपासलेले तिन्ही नमुने निगेटिव्ह आले. यामुळे तिघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या दरम्यान, आई-वडील व मुलाने त्यांना सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या रुग्णसेवेची प्रशंसा केली. डॉक्टरांचे उपचार, त्यांनी दिलेले हिमतीचे बळ आणि आपल्याला बरे व्हायचे आहे, ही सकारात्मक वृत्ती ठेवल्याने आजारातून बरे झालो, असेही त्यांचे म्हणणे होते. तिघांना रुग्णालातून घरी नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक आले होते. तिघेही कोरोनामुक्त झाले असले तरी पुढील १४ दिवस त्यांना घरीच राहावे लागणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share