WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बाबासाहेबांची १२९ वी जयंती घराघरात साजरी

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

देशात, राज्यात आणि विदर्भातही कोरोना रुग्नांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने देशातील लॉकडाउन चा अवधी सरकारने वाढविल्याचे जाहिर केले असून कोरोनाच्या सावटातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वि जयंती देशभरातील भीम अनुयायानी घरातच साजरी केली असुन शहरवासीयांनी ही आपआपल्या घरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाचे पूजन करुन त्याना अभिवादन केले.

देशात कोरोना नावाच्या महाभयंकर रोगाचे सावट गडद होत चालल्याने शासनाने सावधगिरीच्या प्रत्येक उपाय योजनान बरोबरच सोशल डिस्टसिंग चे ही नियम बांधले असून देशात संचार बंदी लागु केली आहे या काळात कोणीही घराबाहेर पडू नये याची खबरदारी घेतली जात असल्याने सर्वच सार्वजनिक उत्सव सोहळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व घरातच साजरे करण्याच्या शासनाच्या सूचनांचे पालन करुण भीम अनुयायानी ही घरातच या महमानवाची जयंती साजरी करुण शासनाच्या नियमांचे पालन केले आहे. या अनुशंगाने घरातील बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमांचे पूजन करुण त्याना हारअर्पण करण्यात आले तसेच घराच्या आवारात व रेलिंगवर दीप प्रज्वलित करुण गुलामीच्या अंधारातून मानवतेच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या या महामानवाला मानवंदना देण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share